WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahajyoti Free Tablet Yojana 2025: 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2025! मोबाइल मधून असा करा अर्ज

Mahajyoti Free Tablet Yojana 2025: मित्रांनो तुम्ही पण 10वी ची परीक्षा झाला आहेत का? तर सध्या महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2025-27 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाजोतीमार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

Mahajyoti Free Tablet Yojana 2025 या योजनेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या Free Tablet Yojana 2025 चा लाभ घ्या.

Mahajyoti Free Tablet Yojana 2025-27 Eligibility

आवश्यक पात्रता : जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • 1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.
  • 2) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी
  • 3) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी
  • 4) जे विद्यार्थी सन 2025 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचे मार्कशीट जोडावे.
  • 5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.(Mahajyoti Registration)
  • 6) विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
  • 7) विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल

Mahajyoti Free Tablet Yojana 2025-27 Required Document

आवश्यक कागदपत्रे :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • 1) 10 वी ची गुणपत्रिका
  • 2) 11 वी सायन्स घेतल्याचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट)
  • 3) आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित)
  • 4) रहिवाशी दाखला/डोमासाईल सर्टिफिकेट (Domicile Certificate)
  • 5) जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • 6) वैद्य नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)
  • 7) दिव्यांग असल्यास दाखला
  • 8) अनाथ असल्यास दाखला

महाज्योती मोफत टॅब्लेट योजना सामाजिक व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे

अ. क्रसामाजिक प्रवर्गटक्केवारी 
1इतर मागास वर्गीय (OBC)59%
2निरधीसूचित जमाती – अ (VJ-A)10%
3भटक्या जमाती – ब (NT-B)8%
4भटक्या जमाती – क (NT-C)11%
5भटक्या जमाती – ड (NT-D)6%
6विशेष मागास वर्गीय (SBC)6%
एकुण100%

समांतर आरक्षण पुढील प्रमाणे :

  • 1. प्रवर्ग निहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
  • 2. दिव्यांगांकरिता 4% जागा आरक्षित आहे.
  • 3. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

अर्ज कसा करावा : जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढील स्टेप द्वारे तुम्ही अर्ज करू शकता.

  • 1) महाजोतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करा.
  • 2) आता Application for MHT-CET/JEE/NEET-2025-27 Traning या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
  • 3) अर्जासोबत ‘ ब ‘ मध्ये नमूद कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.

Mahajyoti Tab Registration Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महत्वाच्या नियम अटी व शर्ती

जर तुम्ही Mahajyoti Free Tablet Yojana 2025 या योजनेसाठी अर्ज करताय तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा.

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 मुदतवाढ झाली.
  • पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकार याबाबतचे सर्वाधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महा ज्योती यांचे राहतील.
  • अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ Mahajyoti Call Centre वर संपर्क करावा. संपर्क क्र. 0712-2870120/21
  • 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE/NEET या परीक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.

Mahajyoti Free Tablet Yojana 2025 Apply Online :

📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्जApply Online
📜 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a Comment