SSSSC CGL Exam 2025: कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित पदवी स्तर परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षा 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2025 दरम्यान संगणकावर आधारित असेल. त्यामुळे ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता त्यांनी लवकर चेक करा.
उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या शहराची माहिती 3 सप्टेंबरपासून उपलब्ध करण्यात आली आहे, तर प्रवेशपत्र परीक्षेच्या 2-3 दिवस आधी डाउनलोड करता येईल. परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, संख्यात्मक अभियोग्यता आणि इंग्रजी आकलन या विभागांचा समावेश असेल.
SSC CGL Exam Dates 2025-26 :
Tier 1 परीक्षा 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2025 या दरम्यान होणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित असेल आणि 15 दिवसांच्या कालावधीत विविध शिफ्टमध्ये घेतली जाईल. उमेदवारांना परीक्षेच्या शहराची माहिती 3 सप्टेंबर 2025 पासून एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल आणि प्रवेशपत्र (SSC CGL admit card 2025) परीक्षेच्या 2 ते 3 दिवस आधी डाउनलोड करता येईल.
आयोगाने सीजीएल टीयर 1 (CGL Tier 1) परीक्षा 2025 च्या आयोजनाची तयारी पूर्ण केली आहे. अधिकृत माहितीनुसार, SSC CGL 2025 Tier 1 परीक्षा खालील तारखांना घेण्यात येईल:
- परीक्षा: एसएससी सीजीएल टीयर 1
- माध्यम: संगणक आधारित परीक्षा
- तारीख: 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2025 (15 दिवस)
Events | Dates |
येथे क्लिक करा (SSC CGL City Intimation 2025) | 3rd September 2025 |
येथे क्लिक करा (SSC CGL Admit Card 2025) | By 9th September 2025 |
Exam Date | 12th to 26th September 2025 |
SSC CGL 2025 Tier 1 Exam Pattern :
एसएससी सीजीएल टियर १ परीक्षा पात्रता स्वरूपाची असेल आणि अंतिम निवडीमध्ये गुणांची गणना केली जाणार नाही. तथापि, कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यात शॉर्टलिस्ट केले जाईल.
परीक्षेची पद्धत: ऑनलाइन (संगणक-आधारित परीक्षा)
- विषय: ४ (सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य जागरूकता, संख्यात्मक अभिरुची आणि इंग्रजी आकलन)
- प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
- प्रश्नांची संख्या: १००
- एकूण गुण: २००
- कालावधी: ६० मिनिटे (१ तास)